Category: greats

श्री. श्रीकृष्ण गंगाधर आठवले

पूल बांधणीतील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ जन्म 1946 वंशावळ संदर्भ : सोमेश्वर 1/3अ आज वयाच्या 82व्या वर्षी देखील तरुणाच्या उत्साहाने दिवसातून आठ तास काम करणारे आणि अगदी वेगळ्याच क्षेत्रात म्हणजे पूलबांधणीच्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा दैदिप्यमान ठसा उमटविणारे जागतिक कीर्तीचे तज्ज्ञ म्हणून श्रीमान श्रीकृष्ण गंगाधर आठवले यांचा अत्यंत गौरवपूर्वक उल्लेख करावा लागेल. त्यांची स्वत:ची ‘आठवले – लिस्टॅड अ‍ॅण्ड […]

श्री. विजय मुकुंद तथा दादासाहेब आठवले

‘शोगिनी’ यशाचे शिल्पकार जन्म 01/01/1946 वंशावळ संदर्भ : जांभुळपाडा एका कर्तृत्ववान आणि असामान्य व्यक्तिमत्त्वाची आपण ओळख करून घेणार आहोत. पुणे-सातारा एक्स्प्रेस हायवेला लागूनच खेड-शिवापूर जवळील डोंगरांच्या छायेत ‘शोगिनी’चा एक विस्तारित भव्य प्रकल्प येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशांचे, वाटसरूंचे लक्ष वेधून घेताना दिसतो. ‘शोगिनी टेक्नोआर्टस्’ ने केलेल्या उत्कर्षाचा, उन्नतीचा तो चालता – बोलता पुरावा आहे. या विशाल औद्योगिक प्रकल्पाचे […]

प्राध्यापक रामचंद्र बळवंत आठवले

संस्कृतचे प्रकांडपंडित, प्रभावी वक्ते, कीर्तनकार,  संगीताचे षौकिन, आणि प्रखर राष्ट्रीय वृत्तीचे जीवनकाल 1894-1987 वंशावळ संदर्भ : गुहागर 10 ज्यांचा जन्म आणि पदवीपर्यंतचे शिक्षण महाराष्ट्रात झाले आणि नोकरी निमित्त वयाच्या 25व्या वर्षापासून पुढे तब्बल 50 वर्षे (म्हणजे वयाच्या 75व्या वर्षापर्यंत) ज्यांचं कार्यकर्तृत्व गुजराथ राज्यात अहमदाबाद येथे बहरले आणि त्यानंतर वयाच्या 75व्या वर्षापासून 93व्या वर्षापर्यंत जीवनाची अखेरची […]

नारायण विष्णु आठवले

विशेष व्यक्तिमत्त्व नारायण विष्णु आठवले हे आठवले कुळातील एक विशेष उल्लेखनीय व्यक्तिमत्त्व. त्यांनी सन 1939 मध्ये वयाच्या 78व्या वर्षी लिहिलेल्या सुमारे 100 पृष्ठांच्या आत्मचरित्राच्या हस्तलिखिताची प्रत अत्यंत निष्ठापूर्वक नि काळजीपूर्वक त्यांचे नातू, श्री. श्रीपाद यशवंत आठवले यांनी आजोबांचा अमोल ठेवा म्हणून जपून ठेविली आहे. त्यावरून त्याची थोडक्यात माहिती पुढे दिली आहे. कै. ना. वि. आठवले […]

रामचंद्र महादेव आठवले

तत्त्वनिष्ठलेखक, वक्ते, इतिहाससंशोधक आणि ज्वलंत हिंदुत्वाचे कट्टर पुरस्कर्ते जीवनकाल 1901 ते 1988 नाचणे 6 दिनांक 1 नोव्हेंबर 1901ला जन्मलेल्या आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभलेल्या एका अत्यंत तत्त्वनिष्ठ प्रखर आयुष्य जगलेल्या रामचंद्र महादेव आठवले यांचे दिनांक 31 डिसेंबर 1988ला वयाच्या 88व्या वर्षी देहावसान झाले. त्यांच्या निधनाने जणू एक वृक्षच उन्मळून पडला ! ‘मोडेन पण वाकणार नाही’ हे […]

दिवाणबहाद्दुर रामचंद्र  सदाशिव आठवले

जीवनकाल: 1872 ते 1955 वंशावळ संदर्भ : गुहागर 1/8 माझे आजोबा दिवाणबहादुर रामचंद्र सदाशिव तथा भाऊसाहेब आठवले यांचा जन्म एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात 1872 साली एका वैदिक घराण्यात झाला. त्यांचे वडील वेदशास्त्रसंपन्न व वेदपठण करणारे होते. कुटुंब मोठे होते व त्यामानाने आर्थिक स्थिती कनिष्ठ, मध्यम वर्गातील होती. आमचे आजोबा, भाऊसाहेब लहानपणापासूनच फार हुशार होते. त्यांना संस्कृत […]

अरविंद नारायण आठवले

उद्योगपती आधीच्या लेखातील नारायण महादेव तथा नानासाहेब आठवले यांचे अरविंदराव हे ज्येष्ठ चिरंजीव. आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर, अरविंदरावांना एक दुर्मिळ संधी मिळाली. त्या काळच्या ब्रिटिश सरकारने तरूण भारतीयांना औद्योगिक शिक्षण मिळावे म्हणून लॉर्ड बेव्हिन यांच्या नावाने उपक्रम चालू केला होता. त्यात तरूण व होतकरू भारतीय तरूणांना सरकारी खर्चाने इंग्लंडला पाठवून शिक्षण देण्यात येत असे. […]

नारायण महादेव उर्फ नानासाहेब आठवले

उद्योगपती (श्रीमती पार्वतीबाई यांचे पुत्र) कोकणामधला रत्नागिरी जिल्हा हा त्या मातीतून निर्माण झालेल्या महामानवांसाठी प्रसिद्धच आहे. याच जिल्ह्यात असलेल्या देवरुख या तालुक्याच्या गावी नानासाहेबांचा जन्म 15 डिसेंबर 1890 नव्वद रोजी झाला. अतिशय सामान्य परिस्थितीतील आईबापांच्या पोटी जन्माला आलेल्या या मुलाचे दुर्दैव बहुधा पाचवीलाच पुजलेले होते. दीड वर्षाच्या वयातच पितृछत्र हरवल्याने, आईबरोबर या मुलाला आपल्या आजोळी […]

थोर समाजसेविका श्रीमती पार्वतीबाई महादेव आठवले

महर्षी कर्वे यांच्या सहकारी आणि अनाथ बालिकाश्रमाच्या प्रमुख आधारस्तंभ जन्म: 1870 वंशावळ संदर्भ: सोमेश्र्वर 21 अत्यंत करारी स्वभावाच्या, स्वाभिमानी वृत्तीच्या, लहान वयातच वैधव्य वाट्याला आलेल्या, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या निकटच्या सहकारी, त्यांनीच हिंगणे येथे स्थापन केलेल्या अनाथ बालिकाश्रमाच्या प्रमुख आधारस्तंभ, त्या संस्थेला देशातून नि परदेशातून सहस्त्रावधी रुपयांच्या देणग्या मिळविणार्‍या, त्यासाठी वर्षानुवर्षे अहोरात्र भ्रमंती करणार्‍या, […]

प्राचार्य सदाशिव नथू आठवले

जीवनकाल 1923 ते 2001 वंशावळ संदर्भ : नागाव 1/7 अलिबागजवळील सातघर या खेड्यात दि. 3 मार्च 1923ला जन्मलेल्या सदाशिव नथू आठवले यांना 79 वर्षांचं दीर्घायुष्य लाभलं. पुण्यात वृद्धापकाळाने दि. 8 डिसेंबर 2001ला बेशुद्धावस्थेत त्यांचं निधन झालं. मुंबई विद्यापीठातून एम. ए. पदवी संपादन केल्यावर त्यांनी 1946 मध्ये पुण्याच्या स. प. महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कामास प्रारंभ केला. […]