मागील कार्यक्रम


एप्रिल  २०२५: एक विशेष व अभिमानास्पद घटना

रविवार ९ मार्च रोजी आमच्या आईचा “ती. शांता पुरुषोत्तम आठवले” हिचा “१०१ वा वाढदिवस” पुणे येथे साजरा केला. कार्यक्रमाची सुरुवात “गणेश पूजन” व “भारत माता पूजनाने” झाली. त्यानंतर “अथर्वशीर्ष” आणि “एकात्मता मंत्र” सर्वांनी मिळून म्हटला. आईच्या “पतवंडांनी” गायन व तबला आणि बासरी वादन केले.

 यावेळी सामाजिक काम करणाऱ्या चार महिलांना कृतज्ञतापूर्वक “शांता व पुरुषोत्तम पुरस्कार” दिला. रुपये २५,००१/- प्रत्येकी व सन्मान चिन्ह.

— सुमेधा ताई चिथडे

 सैन्यासाठी “ऑक्सिजन जनरेशन अँड रिफिलिंग प्लांट”

— पुनम ताई मेहता

 “मुळशी तालुक्यात”, तसेच “जनकल्याण समिती”, “पूर्वांचल विकास” कामात मोठा सहभाग.

— स्वातीताई कदम.

 “मुळशी तालुक्यात” ५५ गावात ९५ बचत गट स्थापन केले व जवळपास “२,००० महिलांच्या सबलीकरणासाठी” प्रयत्न.

— डॉ माधुरी ताई डोंगरे.

 संगीत क्षेत्रात स्वतः डॉक्टरेट मिळवली. त्यांच्या तीन विद्यार्थिनींना डॉक्टरेट मिळाली. आणि अजून पाच विद्यार्थिनींच्या त्या गाईड. “शास्त्रीय संगीतात दोन नवीन रागांची निर्मिती” व त्याला मान्यता.

त्यानंतर “सदाफुली सुमंगल संस्थे”मार्फत “कै काका आठवले वसतीगृहाला” निधी दिला.

 शेवटी पुण्यातील कात्रज ते कोंढवा रस्त्यावरील “कै. बाळासाहेब देवरस रुग्णालयाला” रु २५ लक्ष असा भरघोस कृतज्ञता निधी दिला.

पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

एप्रिल  २०२५: सौ शैला मुकुंद यांचा सन्मान

लेखिका सौ शैला मुकुंद यांना पहिला ‘विद्याताई अभिषेकी स्मृती पुरस्कार’ हा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी पं शौनक अभिषेकी, पं सत्यशील देशपांडे, उज्ज्वल केसकर, डॉ सतीश देसाई उपस्थित होते. अभिषेकी बुवांवर पुस्तक लिहीत असताना विद्यताई यांचा सहवास लाभला आणि त्यांचेव्यक्तिमत्व उलगडत गेले. त्यांच्या नावाने मिळालेला हेपुरस्कार महत्वाचा आहे असे शैला मुकुंद म्हणाल्या.

नोव्हेंबर २०२४: जीवन गौरव पुरस्कार-डॉ शुभदा मोघेजीवन गौरव पुरस्कार-डॉ शुभदा मोघे

‘वर्ल्ड नेटवर्क फॉर प्रमोशन ऑफ हिंदी’ या संस्थेने २७ डिसेंबर २०२४ ​-   ‘हिंदी दिवस’ ​या समारंभात आपल्या जेष्ठ सभासद डॉ शुभदा मोघे यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान केला. त्यांचे चित्तपावन आठवले फौंडेशन तर्फे हार्दिक अभिनंदन. 

November 2024: Dishant Unnat Athavale:

He holds B. Com degree from Gujrat University. He is now a certified Cost & Management Accountant – CMA from Institute of Cost Accountants of India (ICMAI).

November 2024: Mr. Vishikh Dhundiraja Athavale, Bangaluru

We are proud to announce that Mr. Vishikh Dhundiraja Athavale, son of Mr. Dhundiraja Hebbar Athavale and Mrs. Veda Athavale, has successfully completed his PhD at the University of Pennsylvania, USA. His research focused on “Electronic Structure Methods for Nonadiabatic Dynamics” in the field of quantum chemistry.

He completed his undergraduate studies at the Indian Institute of Science, Bangalore.

मोफत प्लस्टिक सर्जेरी शिबीर ३ आणि ४ मे २०२४ आपला सहभाग 

आपल्या संस्थेचे एक संचालक डॉ निशिगंध अरविंद आठवले हे रायगड   मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या पुढाकाराने  ३ आणि ४ मे २०२४ रोजी सिव्हिल हॉस्पिटल, अलिबाग येथे ‘मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर’ आयोजित केले होते. त्याचे हे इतिवृत्त ……

चित्पावन आठवले फाऊंडेशनचा तिसरा वर्धापन दिनसोहळा – पुणे १७ मार्च २०२४

आपल्या फाउंडेशनचा तिसरा वर्धापनदिन रविवार १७ मार्च २०२४ रोजी कलादालन सभागृह, पुणे येथे मोठ्या थाटामाटात साजरा झाला. त्याचे हे इतिवृत्त ……

वडोदरा, गुजरात येथील स्नेहसंमेलन ५ नोव्हेंबर २०२३

दिनांक ५ नोव्हेंबर २०२३ रोजी, आठवले परिवार गुजरात  यांचे  स्नेह संमेलन, आठवले परिवार गुजरातचे वरिष्ठ सदस्य श्री विजय आठवले, श्री अशोक आठवले आणि श्री राजेन्द्र आठवले हयांच्या मार्गदर्शनात शुक्ल यजुर्वेदीय महाराष्ट्रीय ब्राह्मण मंडळ दांडिया बाज़ार वडोदरा येथे साजरे करण्यात आले. कार्यक्रमाला एकूण उपस्थिती ३५ होती. याही कार्यक्रमाची काही क्षणचित्रे देत आहोत.

पुणे येथीलस्नेहसंमेलन ४नोव्हेंबर२०२३

पुणे येथील स्नेहसंमेलन ४ नोव्हेंबर २०२३ रोजी उत्साहात पार पडले . ‘शब्द’ या संस्थेच्या कलाकारांनी *नेव्हर माईंड* या नाटकाचे अतिशय सुंदर अभिवाचन केले. नंतर अल्पोपहार होऊन कार्यक्रम समाप्त झाला. ३५ सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाची काही क्षणचित्रे देत आहोत.

श्री नितीन आठवले – काही विशेष – ऑक्टोबर २०२३

मराठा चेम्बर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर यांच्या ‘संपदा ऑकटोबर २०२३’ ह्या मासिकात श्री नितीन यांचा  “Enhancing Performance efficiencies with Upskilling and Reskilling”हा लेकळ छापून आला होता.

  • श्री. गणपती अथर्वशीर्ष पठण स्पर्धा – १८ सप्टेंबर २०२२
    आपल्या आठवले फाउंडेशनच्या सांस्कृतिक मंचाद्वारे गणेशोत्सवाच्या दरम्यान गणपती अथर्वशीर्ष पठण स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचा मुख्य उद्देश या निमित्ताने अथर्वशीर्षाचे स्पष्ट व शुद्ध उच्चारात पठण केले जावे हा होता . परीक्षक म्हणून डॉ. शुभदा नातू यांनी काम पाहिले. एकूण २३ स्पर्धकांनी यात भाग घेतला. चार वयोगट करण्यात आले होते व प्रत्येक वयोगटात पहिल्या तीन क्रमांकांना बक्षिसे […]
  • चित्पावन आठवले फौंडेशन – प्रथम वार्षिक सर्वसाधारण सभा, २४ ऑगस्ट २०२२
    चित्पावन आठवले फौंडेशनची प्रथम वार्षिक सर्वसाधारण सभा हॉटेल श्रेयस, पुणे येथे २४ ऑगस्ट २०२२ रोजी संप्पन झाली. श्री अनिल महादेव हे अध्यक्षपदी होते. त्यावेळी १७ भागधारकांपैकी १४ भागधारक उपस्थित होते. तसेच कंज अँड अससोसिएट्स व प्रीतम आठवले अँड कंपनी यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वसाधारण विषयांमध्ये, सभेने संस्थेच्या २०२१-२२ च्या आर्थिक ताळेबंदाला एकमताने संमती दिली. तसेच […]
  • सौ. शैला मुकुंद यांच्या पुस्तकाचे प्रकाशन: १७ एप्रिल २२
    आपल्या आठवले परिवाराच्या सदस्या सौ. शैला मुकुंद आठवले यांनी भारत गायन समाज, पुणे या संस्थेला एकशे दहा वर्ष पूर्ण झालेल्या निमित्ताने लिहिलेल्या – ‘एक सुरेल स्वरयात्रा ११० वर्षांचा सांगीतिक प्रवास’ या पुस्तकाचे प्रकाशन विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते १७ एप्रिल २०२२ रोजी झाले.
  • रामरक्षा पठण स्पर्धा – १० एप्रिल २०२२
    रविवार दि . १० एप्रिल २०२२ रोजी रामनवमी होती. त्यानिमित्ताने आठवले सांस्कृतिक मंचातर्फे रामरक्षा पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पाच वयोगटातील चित्पावन आठवले कुटुंबातील २६ स्पर्धकांनी रामरक्षेची ऑडियो क्लिप पाठवली होती. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ह. भ. प. चारुदत्त आफळे गुरुजी यांनी प्रत्येक गटातील तीन विजेत्यांची निवड केली. सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक दिले गेले व विजेत्यांना […]
  • बडोदा स्नेहसंमेलन
    दिनांक 03.04.2022 रोजी वडोदरा येथे झालेल्या आठवले परिवार गुजरातच्या स्नेहसंमेलनाचा अहवाल दिनांक 03.04.2022 रोजी, चित्पावन आठवले फाउंडेशनचा पहिला वर्धापनदिन आणि हिन्दू नव वर्ष “गुढ़ी पाडवा” आठवले परिवार गुजरातच्या वरिष्ठ सदस्य श्री विजय आठवले यांच्या अध्यक्षते खाली हॉटेल व्हाईट पोटेटो अकोटा वडोदरा येथे साजरा केला. बडोदा आणि आसपासच्या भागातील एकूब ३९ सदस्य उपस्थित होते. श्री राजेंद्र […]
  • इनकॉर्पोरेशनचा पहिला वर्धापन दिन – २७ मार्च २०२२
    आपली “चित्पावन आठवले फाउंडेशन” ही संस्था १६ मार्च २०२१ रोजी अस्तित्वात आली. १६ मार्च २०२२ ला संस्थेला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त आठवले पररवारातील सर्व सभासदांचे ठिकठिकाणी मेळावे घेऊन संस्थेच्या गेल्या वर्षातील कार्याचा आढावा घेणे व भविष्यातील योजनांची माहिती द्यावी असे ठरले व त्याप्रमाणे नागाव, बडोदा व नाशिक येथे मेळावे घेतले गेले. विडिओ खाली पाहावा. […]
  • नाशिक स्नेहसंमेलन
    संस्थेचा प्रथम वर्धापन दिवस नाशिक येथे दि १९ मार्च २०२२ रोजी साजरा करण्यात आला. सात कुटुंबातील १३ व्यक्तीनी एकमेकांचे ओळख करून घेतली. त्या सर्वांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सुरुवातीला, पुण्यातील श्री श्रीकांत गोपाळ यांनी गुगल मिट च्या माध्यमातून सर्वांचे स्वागत केले व संस्थेच्या उद्देशांची, कामाची व विविध योजनांची माहिती दिली. त्यानंतर श्री श्रीनिवास […]
  • नागाव स्नेहसंमेलन
    २२ फेब्रुवारी २०२२ रोजी नागाव आणि अलिबाग येथील आठवले कुटुंबातील सदस्य तसंच चित्पावन आठवले फाऊंडेशनचे पुण्यातील संचालक श्री विनायक विष्णू यांनी नागाव खालची आळी इथल्या गणपती मंदिर सभा मंडपात संवाद साधला. आठवले फाउंडेशनतर्फे सुरु असलेल्या विविध उपक्रमाबद्दल त्यांनी सर्वाना माहिती दिली. यावेळी नागवकरांच्या वतीने श्री रमेश प्रभाकर यांच्या हस्ते श्री विनायक यांचा शाल आणि श्रीफळ […]
  • कुलसम्मेलन – मार्च २०२०
    चित्पावन आठवले कुळाचे कुलसंमेलन 1 मार्च ला पुणे येथे प्रतिज्ञा मंगल कार्यालय, कर्वेनगर येथे संपन्न झाले. महाराष्ट्र चित्पावन संघाचे श्री. जयंत नातू, श्री. अशोक वझे, तसेच श्री. अनिल गानू हे खास निमंत्रित म्हणुन हजर होते। सकाळ 8 वाजता सभासदचे नाव नोंदणीस आरंभ झाला व 280 जणांनी नाव नोंदणी केली. इतका अभूतपूर्व प्रतिसाद खचीतच एखादया कुलसंमेलनास […]