दिनांक 03.04.2022 रोजी वडोदरा येथे झालेल्या आठवले परिवार गुजरातच्या स्नेहसंमेलनाचा अहवाल दिनांक 03.04.2022 रोजी, चित्पावन आठवले फाउंडेशनचा पहिला वर्धापनदिन आणि हिन्दू नव वर्ष “गुढ़ी पाडवा” आठवले परिवार गुजरातच्या वरिष्ठ सदस्य श्री विजय आठवले यांच्या अध्यक्षते खाली हॉटेल व्हाईट पोटेटो अकोटा वडोदरा येथे साजरा केला. बडोदा आणि आसपासच्या भागातील एकूब ३९ सदस्य उपस्थित होते. श्री राजेंद्र आठवले ह्यांनी, उपस्थितांचे स्वागत केले आणि कार्यक्रमची सुरवात “वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटी समप्रभ” ह्या श्लोकाने केली. श्री राजेंद्र आठवले ह्यांनी थोडक्यात आठवले कुलवृतांताविषयी, 2020 ला झालेल्या आठवले संमेलना विषयी सुतोवाच करून, 16 मार्च 2021 रोजी चित्तपावन आठवले फाउंडेशन ह्या संस्थेच्या स्थापने विषयी सगळ्यांना माहिती दिली. त्या नंतर पुण्याहून चित्पावन आठवले फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्री श्रीकांतजी नी गूगल मीटने उपस्थितांशी संवाद साधला. श्री श्रीकांतजी नी फाउंडेशनची उद्दीष्टे, आणि फाउंडेशन च्या आता पर्यंत झालेल्या कामाविषयी तसेच पुढील वाटचाली बद्दल थोडक्यात माहिती दिली. आठवले परिवार गुजरात कुटुंबातील सदस्यांनी लवकरात लवकर मेंबर व्हावे असे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी आठवले परिवार गुजरात वतीने डॉ सौ प्रतिभाताईचा आणि त्यांच्या कार्याचा औपचारिक परिचय सौ सीमंतीनी अतुल ह्यांनी केला. गुजरात आठवले परिवाराच्या वरिष्ठ सौ सुधाताई अशोक आणि सौ तनुजा राजेन्द्रच्या यांच्या हस्ते डौ सौ प्रतिभाताईचा यांचा पुष्पगुछ आणि मानचिन्ह म्हणून छोटी गुढी देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर सर्व उपस्थित आठवले मंडळींनी आपापला परिचय इतरांना करून दिला. त्यानंतर उपस्थित महिलाना चैत्री हळदी कुंकू दिले. श्री सुनील आठवले ह्यांनी उपस्थित आठवले मंडळींनी पुन्हा एकदा लवकरात लवकर मेंबर व्हावे असे आवाहन केले. श्री राजेंद्र आठवले ह्यांनी आभार प्रदर्शन केले आणि श्रीमती सुलक्षणा गोविंद ह्यांनी पसायदान म्हटले आणि प्रीतिभोजनचा आस्वाद घेत कार्यक्रमाची सांगता झाली. एकंदरीत जमलेल्या सगळ्यांना आजचा हा कार्यक्रम अतिशय आवडला आणि आपण पुढे असेच कार्यक्रम करत राहू अशी सर्वांनी ग्वाही दिली.




