आपल्या आठवले फाउंडेशनच्या सांस्कृतिक मंचाद्वारे गणेशोत्सवाच्या दरम्यान गणपती अथर्वशीर्ष पठण स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचा मुख्य उद्देश या निमित्ताने अथर्वशीर्षाचे स्पष्ट व शुद्ध उच्चारात पठण केले जावे हा होता . परीक्षक म्हणून डॉ. शुभदा नातू यांनी काम पाहिले. एकूण २३ स्पर्धकांनी यात भाग घेतला. चार वयोगट करण्यात आले होते व प्रत्येक वयोगटात पहिल्या तीन क्रमांकांना बक्षिसे […]
Category: event
चित्पावन आठवले फौंडेशन – प्रथम वार्षिक सर्वसाधारण सभा, २४ ऑगस्ट २०२२
चित्पावन आठवले फौंडेशनची प्रथम वार्षिक सर्वसाधारण सभा हॉटेल श्रेयस, पुणे येथे २४ ऑगस्ट २०२२ रोजी संप्पन झाली. श्री अनिल महादेव हे अध्यक्षपदी होते. त्यावेळी १७ भागधारकांपैकी १४ भागधारक उपस्थित होते. तसेच कंज अँड अससोसिएट्स व प्रीतम आठवले अँड कंपनी यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वसाधारण विषयांमध्ये, सभेने संस्थेच्या २०२१-२२ च्या आर्थिक ताळेबंदाला एकमताने संमती दिली. तसेच […]
सौ. शैला मुकुंद यांच्या पुस्तकाचे प्रकाशन: १७ एप्रिल २२
आपल्या आठवले परिवाराच्या सदस्या सौ. शैला मुकुंद आठवले यांनी भारत गायन समाज, पुणे या संस्थेला एकशे दहा वर्ष पूर्ण झालेल्या निमित्ताने लिहिलेल्या – ‘एक सुरेल स्वरयात्रा ११० वर्षांचा सांगीतिक प्रवास’ या पुस्तकाचे प्रकाशन विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते १७ एप्रिल २०२२ रोजी झाले.
रामरक्षा पठण स्पर्धा – १० एप्रिल २०२२
रविवार दि . १० एप्रिल २०२२ रोजी रामनवमी होती. त्यानिमित्ताने आठवले सांस्कृतिक मंचातर्फे रामरक्षा पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पाच वयोगटातील चित्पावन आठवले कुटुंबातील २६ स्पर्धकांनी रामरक्षेची ऑडियो क्लिप पाठवली होती. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ह. भ. प. चारुदत्त आफळे गुरुजी यांनी प्रत्येक गटातील तीन विजेत्यांची निवड केली. सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक दिले गेले व विजेत्यांना […]
बडोदा स्नेहसंमेलन
दिनांक 03.04.2022 रोजी वडोदरा येथे झालेल्या आठवले परिवार गुजरातच्या स्नेहसंमेलनाचा अहवाल दिनांक 03.04.2022 रोजी, चित्पावन आठवले फाउंडेशनचा पहिला वर्धापनदिन आणि हिन्दू नव वर्ष “गुढ़ी पाडवा” आठवले परिवार गुजरातच्या वरिष्ठ सदस्य श्री विजय आठवले यांच्या अध्यक्षते खाली हॉटेल व्हाईट पोटेटो अकोटा वडोदरा येथे साजरा केला. बडोदा आणि आसपासच्या भागातील एकूब ३९ सदस्य उपस्थित होते. श्री राजेंद्र […]
इनकॉर्पोरेशनचा पहिला वर्धापन दिन – २७ मार्च २०२२
आपली “चित्पावन आठवले फाउंडेशन” ही संस्था १६ मार्च २०२१ रोजी अस्तित्वात आली. १६ मार्च २०२२ ला संस्थेला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त आठवले पररवारातील सर्व सभासदांचे ठिकठिकाणी मेळावे घेऊन संस्थेच्या गेल्या वर्षातील कार्याचा आढावा घेणे व भविष्यातील योजनांची माहिती द्यावी असे ठरले व त्याप्रमाणे नागाव, बडोदा व नाशिक येथे मेळावे घेतले गेले. विडिओ खाली पाहावा. […]
नाशिक स्नेहसंमेलन
संस्थेचा प्रथम वर्धापन दिवस नाशिक येथे दि १९ मार्च २०२२ रोजी साजरा करण्यात आला. सात कुटुंबातील १३ व्यक्तीनी एकमेकांचे ओळख करून घेतली. त्या सर्वांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सुरुवातीला, पुण्यातील श्री श्रीकांत गोपाळ यांनी गुगल मिट च्या माध्यमातून सर्वांचे स्वागत केले व संस्थेच्या उद्देशांची, कामाची व विविध योजनांची माहिती दिली. त्यानंतर श्री श्रीनिवास […]
नागाव स्नेहसंमेलन
२२ फेब्रुवारी २०२२ रोजी नागाव आणि अलिबाग येथील आठवले कुटुंबातील सदस्य तसंच चित्पावन आठवले फाऊंडेशनचे पुण्यातील संचालक श्री विनायक विष्णू यांनी नागाव खालची आळी इथल्या गणपती मंदिर सभा मंडपात संवाद साधला. आठवले फाउंडेशनतर्फे सुरु असलेल्या विविध उपक्रमाबद्दल त्यांनी सर्वाना माहिती दिली. यावेळी नागवकरांच्या वतीने श्री रमेश प्रभाकर यांच्या हस्ते श्री विनायक यांचा शाल आणि श्रीफळ […]
कुलसम्मेलन – मार्च २०२०
चित्पावन आठवले कुळाचे कुलसंमेलन 1 मार्च ला पुणे येथे प्रतिज्ञा मंगल कार्यालय, कर्वेनगर येथे संपन्न झाले. महाराष्ट्र चित्पावन संघाचे श्री. जयंत नातू, श्री. अशोक वझे, तसेच श्री. अनिल गानू हे खास निमंत्रित म्हणुन हजर होते। सकाळ 8 वाजता सभासदचे नाव नोंदणीस आरंभ झाला व 280 जणांनी नाव नोंदणी केली. इतका अभूतपूर्व प्रतिसाद खचीतच एखादया कुलसंमेलनास […]