कुळाचार व सण


गौरी-गणपती

भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर गौरी आणतात. नदीकाठचे किंवा पाणवठ्याजवळचे पाच खडे गौरी म्हणून आणतात व पूजा करतात

श्री महालक्ष्मी पूजा

चित्पावन ब्राह्मण कुटुंबियांमध्ये नवरात्रातील अष्टमीच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा केली जाते. पूर्वी ही पूजा घरोघरी केली जात असे पण हल्ली जागेच्या अडचणीमुळे, सार्वजनिक ठिकाणी, कार्यालय, हॉल किंवा मंदिराच्या प्रांगणामध्ये महालक्ष्मी बसवतात व सर्व भगिनी तिच्या दर्शनासाठी जातात

नवरात्र

भक्तजनांवर देवीची कृपा रहावी, सुखसमृद्धीची वृद्धी व्हावी, आरिष्ट टळावे याकरिता अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्र करण्याची प्रथा आहे. भक्तजनांवर देवीची कृपा रहावी, सुखसमृद्धीची वृद्धी व्हावी, आरिष्ट टळावे याकरिता अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्र करण्याची प्रथा आहे.

बोडण

‘बोडण’ हा एक हिंदू चित्पावन कोकणस्थांतील कुलधर्म, कुलाचार आहे. आपल्या कुळातील चालीप्रमाणे म्हणजेच पारंपारिक वार्षिक, त्रैवार्षिक अगर शुभकार्य झाल्यावर बोडण भरतात. बोडण हे शक्यतो मंगळवारी, शुक्रवारी अथवा रविवारी भरतात. चातुर्मास पौष व चैत्र महिना सोडून हा देवीचा धार्मिक कार्यक्रम करतात.

गोंधळ

गोंधळ किंवा देवीचा गोंधळ हा कुलाचार कोकणातून इतर महाराष्ट्रात अथवा उत्तर कर्नाटकात स्थलांतरित झालेल्या काही चित्पावन कुलामध्ये केला जातो