गोंधळ


गोंधळ किंवा देवीचा गोंधळ हा कुलाचार कोकणातून इतर महाराष्ट्रात अथवा उत्तर कर्नाटकात स्थलांतरित झालेल्या काही चित्पावन कुलामध्ये केला जातो.

सर्वसाधारणपणे विवाहानंतर, नूतन अर्भकाच्या जन्मानंतर हा विधी घरी केला जातो. काही घरांमध्ये अवचित आलेल्या संकटाचे पारिपत्य करण्याकरता नवस बोलला जातो व तो फेडण्याकरता देवीसमोर गोंधळ करतात.

गावातील गोंधळी लोकांना बोलावून देवीसमोर संबळ व इतर वाद्ये वाजवून, अंबामातेची स्तुती व भक्तीची निरनिराळी कवने गायली जातात.