भालचंद्र ![]() ![]() |
||
Father: केशव | Mother: Unspecified | Spouse: भारती |
Children: मंजिरी | ||
Siblings: आनंद |
भालचंद्र केशव – जन्म 10/8/1946. जन्मस्थळ नागाव. विवाह दिनांक 5/5/1973. कन्या 1. शिक्षण एम. एस.सी., पीएच. डी. जीवनपट : उच्च ऊर्जा पदार्थ अनुसंधान प्रयोगशाळेत उच्च पदाधिकारी. शालेय शिक्षण (प्राथमिक) नागाव येथे. (माध्यमिक) अलिबाग येथे. महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे स. प. विद्यालयात. 1972 मध्ये पुणे विद्यापीठाची एम. एस. सी. (ऑर्गनिक केमिस्ट्री) पदवी मिळविली. प्रथम पासूनच उच्च ऊर्जा पदार्थ अनुसंधान प्रयोगशाळा पुणे येथे संरक्षण प्रयोगशाळेत नोकरी. सध्या तेथेच संयुक्त निर्देशक म्हणून नियुक्ती. इंधन प्रधान नोदक (Fuel Rich Propelant) या विषयात मौलिक संशोधन. या लिहिलेल्या प्रबंधास 1996 साली पुणे विद्यापीठाकडून विद्या वाचस्पती (Ph.D) ही पदवी प्रदान 1987साली भारताच्या एअर-इंडिया चे कनिष्क विमान घातपाताने पाडण्यात आले. त्यासंदर्भात सरकार कडून जे मौलिक संशोधन करण्यात आले. त्यात अत्यंत मोलाची कामगिरी. त्या संदर्भातील संपूर्ण अहवाल तयार करण्यासाठी अग्रणी सहभाग. आतापर्यंत सुमारे 14 शोध निबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये प्रसिध्द. 1997 सप्टेंबर मध्ये चतनुगा (टेनसी स्टेट, यू एस. ए) येथे 13 व्या एअर ब्रीदींग एंजीन्स परीसंवादात Somel Studies on fuel Rich Propelant या शोध निबंधाचे वाचन. तो खूप गाजला आता नोकरीतून निवृत्त. वास्तव्य : 17/1, बावधन खु.॥, ‘मांदार’ 20, विज्ञाननगर, पुणे 411021.