|
दत्तात्रय |
||
| Father: विश्वनाथ | Mother: Unspecified | Spouse: उषा |
| Children: मंजिरी(सरदेसाई), शालिनी(अकोलकर) | ||
| Siblings: सुषमा(पंत-वैद्य), शरयू(साठे), कुसुम(लेले), यशवंत(अल्पायुषी) | ||
दत्तात्रय विश्वनाथ – जन्म 22/10/1928. जन्मस्थळ सांगली. मृत्यू 20/02/2002. पुणे. विवाह दिनांक 24/02/1949. शिक्षण : एम. ए., एम. एड. पुत्र 2, कन्या 2. जीवनपट : 1939 साली पुण्यात कुटुंबासह आले. त्यावेळी ते इंग्रजी पहिली (पाचवीत) होते. तेव्हापासून आईला बोर्डिंगच्या व्यवसायात मदत करुन स्वत:चे शिक्षण पूर्ण केले. टायपिंग तसेच डबे पोहोचवण्याची कामेसुध्दा केली. कोणतेही कष्ट करायची तयारी असायची. नंतर बी.ए. बी.टी. केले. नूमवि शाळेत शिकून पुणे त्याच शाळेत 14 वर्षे नोकरी केली. उत्तम शिक्षक म्हणून प्रसिध्द होते. नंतर एम.ए. एमएड केले व 1960 पासून 1988 पर्यंत स. प. महाविद्यालयात प्रोफेसर होते. त्याचकाळात लेखक, प्रकाशक म्हणून प्रसिध्दी मिळाली. विनोदी कथा मोहिनी, रुपा, प्रपंच मधून रहस्य कथा, अनुवाद नवल मधून प्रकाशित झाले. ते सर्व कथासंग्रह आहेत. 1988 साली कॉलेजमधून निवृत्त झाल्यावर कोथरुड येथे राहावयास आल्यानंतर व. दा. भट यांच्शा पुणे विद्यार्थी गृहात ज्योतिष विशारद ही पदवी. वयाच्या 68 ते 70 च्या सुमारास मिळवली. स्वत: पत्रिका करणे, बघणे व उपाय म्हणून कोणत्याही मानधनाची अपेक्षा न ठेवता समाजकार्य म्हणून केले. लोकांना त्याचा खूप फायदा झाला. शेवटपर्यंत कार्यरत होते. शाळेतल्या मुलांच्या इंग्रजीच्या शिकवण्या घेत होते. दि. 20/2/2002 ला त्यांचे हृदयविकाराने निधन झाले एक प्रसन्न, हसरे तसेच दुसर्याच्या मदतीस सदैव तत्पर असे व्यक्तिमत्व. वास्तव्य : सार्थक सोसायटी, फ्लॅट नं. 6-7,पौड रोड,कोथरुड पुणे 411038