|
क्रांतिसेन |
||
| Father: रामचंद्र | Mother: सुमती | Spouse: सुनयना |
| Children: वैनतेय, मानसी(तांबे) | ||
| Siblings: जयध्वजा(पौंशे), यशप्रभा(अभ्यंकर), श्रीविजय(अविवाहित) | ||
क्रांतिसेन रामचंद्र – जन्म 27/7/1942. जन्मस्थळ गिरगाव, मुंबई. विवाह 20/3/1974. पुत्र 1, कन्या 1. शिक्षण : बी.ए. एल.एल.बी. जीवनपट : स्टेट बँकेत सुमारे 37 वर्षे नोकरी केल्यावर स्वेच्छा निवृत्ती. सामाजिक व राष्ट्रीय कार्यातून सहभाग. लेखन, वाचन व व्याख्यानाची आवड. सावरकर राष्ट्रीय स्मारकाचा (मुंबई भागाचा) कोषााध्यक्ष. तसेच सावरकर साहित्य अभ्यास मंडळाचा कार्यवाह.म्हणून काही वर्षे काम केले. विविध विषयावर अनेक वृत्तपत्रे, मासिके यातून लेख प्रसिध्द झाले. आठवले कुलवृत्तांताच्या दुसर्या सुधारित व विस्तृत माहितीपूर्ण आवृत्तीचा सिध्दतेमध्ये महत्त्वाचा सहभाग. स्टेट बँकेच्या पेन्शनर्स असो. च्या ‘संवाद’ मासिकाच्या संपादक मंडळात सदस्य तसेच ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यात पदाधिकारी म्हणून कार्यरत. सुरुवातीपासून मुंबईत वास्तव्य आता पुणे येथे स्थायिक.