रविवार दि . १० एप्रिल २०२२ रोजी रामनवमी होती. त्यानिमित्ताने आठवले सांस्कृतिक मंचातर्फे रामरक्षा पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पाच वयोगटातील चित्पावन आठवले कुटुंबातील २६ स्पर्धकांनी रामरक्षेची ऑडियो क्लिप पाठवली होती. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ह. भ. प. चारुदत्त आफळे गुरुजी यांनी प्रत्येक गटातील तीन विजेत्यांची निवड केली. सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक दिले गेले व विजेत्यांना रोख बक्षीस देण्यात आले. ६ वर्षाखालील मुलांचे विशेष कौतुक करण्यात आले. हा उपक्रम स्पर्धा म्हणून नव्हे तर जास्तीत जास्त लोकांनी शुध्द रामरक्षा पठण करावे अशी ही इच्छा साध्य झाली. विजेत्यांची यादी सोबत दिली आहे.