चित्पावन आठवले फौंडेशन – प्रथम वार्षिक सर्वसाधारण सभा, २४ ऑगस्ट २०२२


चित्पावन आठवले फौंडेशनची प्रथम वार्षिक सर्वसाधारण सभा हॉटेल श्रेयस, पुणे येथे २४ ऑगस्ट २०२२ रोजी संप्पन झाली. श्री अनिल महादेव हे अध्यक्षपदी होते. त्यावेळी १७ भागधारकांपैकी १४ भागधारक उपस्थित होते. तसेच कंज अँड अससोसिएट्स व प्रीतम आठवले अँड कंपनी यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

सर्वसाधारण विषयांमध्ये, सभेने संस्थेच्या २०२१-२२ च्या आर्थिक ताळेबंदाला एकमताने संमती दिली. तसेच श्री प्रीतम आठवले अँड कंपनीची पुढील ५ वर्षासाठी लेखापाल म्हणून एकमताने नियुक्ती केली.

विशेष विषयांमध्ये सभेने १० सभासदांची 'अतिरिक्त संचालक' पदावरून 'संचालक' या पदावर नियुक्ती केली. त्यांचं नावे खालीलप्रमाणे:-
श्री विजय मुकुंद, श्री विनायक विष्णू, श्री आनंद गजानन, श्री श्रीनिवास गजानन, श्री अतुल अरविंद, डॉ मंदार अशोक, श्री सुमित अविनाश, डॉ निशिगंध अरविंद, सौ वर्षा अजित आणि सौ गौतमी अभिराम.

त्यानंतर अध्यक्षांचे आभार मानून सभा समाप्त झाली.

नंतर झालेल्या अनौपचारिक चर्चेमध्ये अनेक महत्वाच्या विषयांवर विस्तृत चर्चा झाली व त्यानंतर सर्वानी एकत्र भोजन केले. 

श्रीकांत आठवले