सुजाता


सुजाता
Female View tree
Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: उल्हास
Children: none
Siblings: none

सुजाता उल्हास – जन्म 13/11/1966. शिक्षण : बी. एस्सी. (होमसायन्स), नर्सिंग कोर्स. जीवनपट : 1986 मध्ये विवाहानंतर नेपाळ, थायलंड, हाँगकाँग, सिंगापूर सहलीला पतीबरोबर प्रयाण. 1990 मध्ये एक वर्षाच्या लहान मुलीसह अमेरिकेत. पतीबरोबर स्थायिक होण्याच्या उद्देशाने टुरिस्ट व्हिसावर प्रयाण. तेथे 4 वर्षांचा खडतर अवघड असा नर्सिंगचा कोर्स प्रावीण्यासह जिद्दीने पूर्ण केला. ग्रीन कार्ड नसल्याने थोड्या प्राप्तीमध्ये भागविणे अवघड. त्यामुळे नातेवाईकांच्या व मित्रमंडळीच्या सहवासाला मुकावे लागले. 1990 ते 2004 या 15 वर्षात आईवडील, सासूसासरे, 2 मेहुणे आदी अगदी मोजक्याच नातेवाईकांच्या 1/2 भेटीवर समाधान मानावे लागले. सप्टेंबर 2004 मध्ये 15 वर्षांनी सर्वजण भारतात येऊ शकले. मोठे दिव्यच होते. आता अमेरिकेत प्रसिध्द अशा बालरोगतज्ज्ञाकडे हॉस्पिटलमध्ये नोकरी सुरु. स्वत:चे घर, मोठी मुलगी 10 वीला व छोटा 9 वर्षांचा मुलगा चौथीत शिकत आहे. माहेरचे नाव : सुजाता श्रीकृष्ण जोशी, पुणे.