श्रीपाद


श्रीपाद
Male View tree
Father: यशवंतMother: UnspecifiedSpouse: ललिता
Children: संजय, भारती
Siblings: दत्तात्रय, मीनाक्षी, मीरा, तारा, मुक्ता

श्रीपाद यशवंत – जन्म 27/12/1931. जन्मस्थळ वाई. विवाह दिनांक 19/06/1955. शिक्षण : एम. ई. (इलेक्ट्रिकल), डी. आय. एम. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : 1954 ते 1958 टाटा इलक्ट्रिक कंपनीतर्फे सहा महिने डेट्रॉईट (अमेरिका) येथे पॉवर स्टेशनच्या डिझाईन अभ्यासाठी गेले होते. त्याच वेळेला अमेरिकेत पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षणाकरिता इलिनॉईस युनिर्व्हसिटीची स्कॉरशिप मिळाली होती. पण जाऊ शकले नाहीत.1958 नंतर पुणे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इलेक्ट्रिकल विषयाचे असिस्टंट प्रोफेसर म्हणून नोकरी केली. तेथेचं पोस्ट ग्रॅज्युएशन केले. एम. इ. पॉवर सिस्टिम इक्वीलिटी मध्ये केले त्याचा अभ्यास बंगलोर येथे इंडियन इन्स्टिट्यूट मध्ये केला. कॉलेजमध्ये एम. ईचा अभ्यास करीत असताना ऑफिसर्स ट्रेनिंग कोर्ससाठी कमिशन मिळून निवड झाली. तो कोर्स कमिटी येथे व नंतर स्कूल ऑफ सिग्नल्स महू येथे एक महिना केला. तदनंतर पुण्यात सिनिअर डिव्हिजनचे कमांडर होते. हिमालयीन इन्स्टीट्यूट ऑफ माँटेनिअरिंग येथे सिलेक्शन झाले व 40 दिवसांचा बेसिक कोर्स केला. 1961 साठी क्रॉम्प्टन पार्किन्सनमध्ये मीटर डिपार्टमेंटमध्ये नोकरी. 1967 पर्यंत प्रथम प्लॅनिंग डिपार्टमेंटमध्ये स्विच गिअर डिव्हिजनला होते. 1964 मध्ये इंग्लंडला आठ महिन्यांच्या कोर्ससाठी गेले होते. 1968 ते 1971 कप्लर हॅमर या फरिदाबाद येथील कंपनीत वर्क्स मॅनेजर म्हणून काम केले. 1971 ते 1976 पर्यंत सिमेन्स-मुंबई येथे मॅनेजर म्हणून काम केले. 1977 डिसेंबर ते 1982 पर्यंत व्होल्टास मध्ये इलेक्ट्रिकल डिव्हिजनल मॅनेजर म्हणून नियुक्ती. 1982 पर्यंत दिल्ली ला ए. बी. बी. कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट पदावर नियुक्ती. 1987 मध्ये वेस्टर्न इंडिया इरेक्टर्स मध्ये कार्यरत व तदनंतर पुण्यात स्थायिक झाले. वेस्टर्न इंडिया तर्फे 1988 मध्ये मांडवी -गुजराथ येथे 18 विंड मिल्स इरेक्ट करुन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे पवनपुत्र हे अवॉर्ड मिळाले. 1988 अखेर राजीनामा देऊन निवृत्त झाले. नंतर एनर्जी डेव्हलपमेंट कौन्सिल तर्फे केंद्र सरकारला सल्लागार म्हणून 1992 पर्यंत काम केले. केंद्र सरकारचे जनरेशन ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन विषयाचे कायदे 1990 मध्ये बदलण्यास व प्रायव्हेट इंडस्ट्रीला स्वतंत्र परवानगी देण्यास सर्व सहाय्य केले. 1988 मध्ये रोटरी क्लब टिळक रोड, पुणे येथे काम सुरु. 1994-95 मध्ये रोटरी क्लब प्रेसिडेंट होते. 1996 मध्ये चिन्मय मिशनचे कन्स्ट्रक्शनचे काम केले. चिन्मय तपोवन ट्रस्टमध्ये काम केले. चिन्मय साधनालयात वेदान्त कोर्स केला. 50 कोटींचा चिन्मय विभूती प्रोजेक्ट 2000 साली केला. त्यासाठी पुण्यात पौड-पवना रस्त्यावर 52 एकर जागा घेतली. डोनेशनसाठी 2 महिने अमेरिकेचा दौरा केला. आवड म्हणून भीमसेन जोशींकडून गायन शिकले. वास्तव्य : नंदादीप, 481क/6, श्रीप्रसाद सोसायटी, पर्वती पुणे 411009