रामकृष्ण


रामकृष्ण
Male View tree
Father: पांडुरंगMother: मनोरमाSpouse: सरोज
Children: स्मिता(देवधर), अनिता(काळे)
Siblings: चंद्रशेखर, माधव, मधुकर, शैला(भागवत), उषा(देशपांडे)

रामकृष्ण पांडुरंग – जन्म 27/11/1934. जन्मस्थळ पुणे. मृत्यू 1/10/2006. विवाह दिनांक 15/05/1960. शिक्षण : बी. ई. (सिव्हिल). कन्या 2. जीवनपट : सिव्हिल वॉटर सप्लाय, रोडस् ड्रेनेज इ. विषयातील मुंबई महानगरपालिकेचे AA+++ दर्जाचे कंत्राटदार व बांधकाम व्यावसायिक. विद्यार्थीदशेत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करुन इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले. इंजिनिअरींग कॉलेजमध्ये ‘मॉडेल मेकिंग’ या विषयात पूल बांधणीसाठी पुरस्कार. आंतरमहाविद्यालयीन बास्केट बॉल, फुटबॉल, कबड्डी स्पर्धेत सहभाग व प्रावीण्य. चांगल्या वा़ङ्मयाचा व्यासंग, वाचन व लेखनाची आवड. नू. म. वि. पुणे येथील 1952 च्या माजी विद्यार्थी संघटनेचे सक्रीय सदस्य, चिटणीसपदी असताना ड्राईंग हॉल, पिण्याच्या पाण्याची सोय करुन देणे, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शाळेसाठी कृतज्ञता निधी गोळा करण्याचे यशस्वी कार्य.वास्तव्य : शैलेश, 12 धनलक्ष्मी सोसायटी, संतोष हॉलसमोर, हिंगणे खुर्द, पुणे 411 051.