प्रमिला(सहस्रबुद्धे)


प्रमिला(सहस्रबुद्धे)
Female View tree
Father: अनंतMother: Unspecified
Children: none
Siblings: माधव, एकनाथ, बाळकृष्ण

प्रमिला अनंत – जन्म 17/07/1940. जन्मस्थळ तळे. विवाह दिनांक 16/5/1962. शिक्षण : एस. एस. सी. जीवनपट : वडिलांची प्राथमिक शिक्षकाची नोकरी. खेडेगावात असल्यामुळे शिक्षणाची आबाळ. 1962 साली विवाहानंतर पतीबरोबर चेंबूर मुंबई येथे वास्तव्य. अगदी छोट्याश्या जागेत टुकीने नेटका संसार केला. 1983 साली पतीचे कॅन्सरने निधन झाल्यावर मोठ्या धैर्याने तीन मुलींचे शिक्षण व मुलींना सुस्थळी पाठवणी करण्याची जबाबदारी पूर्ण केली. आता नातवंडे मुली, जावई यांचे सहवासात पण एकटीने स्वतंत्रपणे आनंदात कालक्रमण. सासरचे नाव : सुषमा वसंत सहस्त्रबुध्दे, चेंबूर