एकनाथ


एकनाथ
Male View tree
Father: अनंतMother: UnspecifiedSpouse: प्रतिमा
Children: अश्विनी(फाटक), अमित
Siblings: माधव, प्रमिला(सहस्रबुद्धे), बाळकृष्ण

एकनाथ (प्रकाश) अनंत – जन्म 01/07/1951. जन्मस्थळ किहीम. विवाह दिनांक 04/12/1977. पुत्र 1, कन्या 1. शिक्षण बी.कॉम. जीवनपट : किहीम ता. अलिबाग, जि. रायगड. या समुद्रकिनार्‍यावरील छोट्या गावात जन्म व 7 वी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण. नंतर 1962 साली सातारा या जिल्ह्याच्या मोठ्या गावी वडिलांच्या निवृत्ती नंतर मोठ्या भावाकडे राहायला गेले. 8 वी ते 11 वी कॉमर्स पर्यंतचे शिक्षण सातारा येथे प्रीडिग्रीच्यावेळी शॉर्टहँडची 120 स्पीडची अवघड परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण. गव्हर्नमेंटच्या 60 शब्द प्रतिमिनिट या टायपिंग परीक्षेत द्वितीय क्रमांक तसेच टायपिंगची चॅम्पियन परीक्षा 78 शब्द प्रतिमिनिट स्पीड व 97.9% अक्युरसी या प्रावीण्याने उत्तीर्ण. नोकरी निमित्ताने पुण्यात वास्तव्य. दोन वर्षे किर्लोस्कर ब्रदर्समध्ये नोकरी. व नंतर स्वगुणावर महाराष्ट्र बँकेत प्रवेश. त्याचवेळी बी. कॉम. परीक्षा व बँकेतील ऑफिसर परीक्षा उत्तीर्ण, मॅनेजर पदावर तासगांव (सांगली जिल्हा) 2 वर्षे, डफळापूर (सांगली जिल्हा) 6 वर्षे, नंतर रत्नागिरी 8 वर्षे, म्हसवड (जि. सातारा) व खुद्द सातारा येथे नोकरी. एकूण 33 वर्षे नोकरी. मुलीच्या उच्च शिक्षणाकरिता पुण्यात बदली मिळाल्यावर 2 वर्षांनी स्थिरस्थावर झाल्यावर वयाच्या 53 व्या वर्षी 2004 साली दोन्ही मुले उच्च शिक्षण घेऊन स्थिर झाल्यावर स्वेच्छा निवृत्ती घेतली. सातारा येथे स्वत:चा फ्लॅट पण सध्या पुण्यात वास्तव्य. वास्तव्य : 232 ब, यादो गोपाळ पेठ, मेघदीप अपार्टमेंट, सातारा 415002.