उषा


उषा
Female View tree
Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: प्रभाकर
Children: none
Siblings: none

उषा प्रभाकर – जन्म 01/07/1928. शिक्षण : एम. ए., बी. एड. जीवनपट : ‘रघुसुता’ या टोपण नावाने कथा लेखन करतात. ‘कांचपात्र’ हा कथासंग्रह जानेवारी 1994 मध्ये प्रसिध्द. कथा लेखनाची अनेक पारितोषिके मिळविली. ललित लेखन व बडबड गीते लिखाण, स्त्री, वीणा, वसंत, अनुराधा, सुवासिनी, प्रपंच, वा़ङ्मय शोभा इत्यांदी मासिकातून कथा लेखन, शालेय शिक्षण सेवासदन, पुणे येथे व महाविद्यालयीन शिक्षण रुईया कॉलेज माटुंगा येथे झाले. 1954 साली बी.ए. (मराठी) होऊन मुंबई विद्यापीठात सर्व प्रथम. तर्खडकर सुवर्णपदक व राम गणेश गडकरी शिष्यवृत्ती प्राप्त. 1956 साली एम. ए. मराठी. वडील लवकर निवर्तल्यामुळे विवाहापर्यंत मोठ्या बहिणीचे यजमान साठे बिस्किट कारखान्याचे संस्थापक ग. रा. साठे यांनी संगोपन केले. सर्व शिक्षण विवाहानंतर झाले. माहेरचे नाव : लीला रघुनाथ डोंगरे.