अश्विनी(फाटक) ![]() ![]() |
||
Father: एकनाथ | Mother: Unspecified | |
Children: none | ||
Siblings: अमित |
अश्विनी एकनाथ – जन्म 11/10/1982. जन्मस्थळ सातारा. विवाह दि. 7/1/07. शिक्षण : बी.ई. कॉम्प्युटर. जीवनपट : चौथी पर्यंत रत्नागिरी येथे शिक्षण चौथी व नंतर सातवीची स्कॉलरशिप मिळविली. 10 वी पर्यंतचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल सातारा येथे. 10 वी च्या परीक्षेत कोल्हापूर बोर्डात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण. 12 वी शास्त्र इलेक्ट्रॉनिक्स विषय घेऊन कोल्हापूर बोर्डात तिसर्या क्रमांकाने व मुलींमध्ये बोर्डात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण. पुण्यात पीइसीटी या नामवंत इंजिनिअरींग कॉलेजमध्ये प्रवेश. धीरूभाई अंबानी यांची शैक्षणिक स्कॉलरशिप रु. 12, 500 दरवर्षी याप्रमाणे 4 वर्षे मिळाली. कॉम्प्युटर विषय घेऊन 2004 मध्ये बी.ई. उत्तीर्ण. त्याचवेळेस कॅम्पस सिलेक्शनमध्ये जागतिक कीर्तीच्या आयबीएम या ख्यातनाम संस्थेत नोकरी प्राप्त. कॉलेजमध्ये चांगल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची मैत्री मिळून नाटकात भाग घेऊन लेखन, अभिनय आदी गोष्टींची माहिती होऊन पुरुषोत्तम करंडक नाट्य स्पर्धेत पहिले सांघिक बक्षीस प्राप्त. विवाहानंतर अश्विनी संदीप फाटक, पुणे आत्ता अमेरिकेत. वास्तव्य : जून 2006 मध्ये पुण्यातील आय. बी. एम.मधील नोकरी सोडून अमेरिकेतील इंडियाना युनिव्हर्सिटी, ब्लूमिंग्टंन येथे इन्फॉर्मेेशन सायन्स या विषयातील एम. एस. करण्याकरीता प्रस्थान.