अमित


अमित
Male View tree
Father: एकनाथMother: UnspecifiedSpouse: नेहा
Children: none
Siblings: अश्विनी(फाटक)

अमित एकनाथ – जन्म 04/11/1978. जन्मस्थळ वाई. शिक्षण एम.ई. (इन्स्ट्रुमेंटेशन) जीवनपट : डफळापूर (जि. सांगली) या गावात पहिली पर्यंत वास्तव्य. नंतर 8 वी, 9 वी पर्यंत रत्नागिरीच्या फाटक हायस्कूलमध्ये शिक्षण. सातारा येथून 10 वी व 12 वी सायन्स परीक्षा उत्तीर्ण. उत्तम मार्कामुळे फ्री सीट मिळून चंद्रपूर (चांदा) येथे नवीनच निघालेल्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दोन वर्षे. अत्यंत प्रतिकूल शैक्षणिक परिस्थितीत सुध्दा उत्तीर्ण तिसर्‍या व चौथ्या वर्षाच्या इंजिनिअरींग शिक्षणाकरीता औरंगाबाद येथील जवाहरलाल नेहरु इंजिनिअरींग कॉलेजमध्ये प्रवेश व बी.ई. (इन्स्ट्रुमेंटेशन) डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण. गेटच्या परीक्षेतील मार्कामुळे पुण्यातील सरकारी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सी.ओई.पी. शिष्यवृत्ती मिळवून एम. ई. (इन्स्ट्रुमेंटेशन) परीक्षा उत्तीर्ण. लगेच इमर्सन एक्सपोर्ट इंजिनिअरिंग या अमेरीकन कंपनीत नोकरी. 2 महिने हॉलंड व नंतर अमेरिकेत 1 ते 1॥ वर्षे कंपनीतर्फे राहून काम करण्याची संधी मिळाली. गेली सहा महिने त्याच कंपनीतर्फे सिंगापूर येथे वास्तव्य. थायलंड, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया या देशात कामाकरिता जावे लागते. डिसेंबर 2005 पर्यंत सिंगापूर येथे वास्तव्य. सप्टेंबर 2006 मध्ये पुणे सोडून बंगलोर येथे हनीवेल येथे कंपनीत मोठ्या पदावर नोकरी.