अंजली ![]() ![]() |
||
Father: Unspecified | Mother: Unspecified | Spouse: आनंद |
Children: none | ||
Siblings: none |
अंजली आनंद – जन्म 28/10/1960. जन्मस्थळ पुणे. विवाह 1994. शिक्षण : एम. एस. सी. (भौतिकशास्त्र), पीएच. डी. जीवनपट : माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण विशेष नैपुण्यासह पूर्ण वडिलांच्या वायुसेनेतील सेवेमुळे शिक्षण. बंगलोर, अलाहाबाद, गुवाहाटी, रायपूर व पुणे येथे शिक्षणाच्या दरम्यान वायुसेनेची कंमाड स्कॉलरशिप ने विभूषित. 1980 ला बी.एस.सी. रसायनशास्त्र नौ. वाडिया कॉलेज मधून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण. एम. एस. सी. भौतिक रसायनशास्त्र 1982 साली नौ. वाडिया कॉलेजमधून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण. पीएच. डी. रसायनशास्त्र विभाग पुणे विद्यापीठ येथून 1988 साली पूर्ण मार्गदर्शक डॉ. सो. फ. पाटील (कुलगुरु भारती विद्यापीठ). विषय Effect of oxides on Radiation Decomposition and Kinetics of annealing in some nitrates and outectics. पीएच. डी. च्या दरम्यान विविध शैक्षणिक व संशोधन संस्थाकडून (विज्ञान आणि प्रौद्योगिकी विभाग, विश्वविद्यालय अनुदान आयोग, वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद भाभा परमाणु अनुसंधान केंद्र) मानद शिष्यवृत्तींचा लाभ.पीएच. डी नंतर 1988-89 हे एक वर्ष पोलंड येथे वूज विश्वविद्यालय येथे संशोधनाचे काम. या कालावधीत विश्वविद्यालयाच्या मानद शिष्यवृत्तीने सन्मानित. विषय Pulse Radiolysis of Glassy Matrices. शैक्षणिक कार्य 1989-91 दरम्यान नौ. वाडिया तसेच फर्ग्युसन कॉलेजमध्ये पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना अध्यापनाचे कार्य. 1991 ते 2005, रसायनशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ येथे व्याख्याता या नात्याने अध्यापन व संशोधनाचे कार्य. अनेक विद्यार्थ्यांना पीएच. डी. साठी मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन. संशोधनाचे विषय, Conducting Polymers, Nanomaterials, Ceramics and their applications. विद्यापीठातून सेवेच्या दरम्यान अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विज्ञान नियतकालिकांमधून शोध निबंध प्रसिध्द. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात सहभाग तसेच शोधनिबंधाचे वाचन. Materials Research Society Of India या संस्थेचे सन्माननीय आजीवन सभासदत्व व संस्थेच्या पुणे विभागाच्या कार्यकारिणीवर निवड. Japan Society for Promotion of Sciences या संस्थेने 2002 मध्ये आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी पुर्ण भारतातील संशोधकांमधून निवड व सहभाग. सिंगापूर येथे 2005 मध्ये भरलेल्या International Conference For Materials For Advanced Technologies. या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात सहभाग तसेच तेथे एका सत्राचे सूत्रसंचालनासाठी निमंत्रण. विद्यापीठातील संशोधनासाठी अनेक संशोधन संस्थाकडून (विज्ञान व प्रऔद्योगिक) विभाग (डी. एस.टी) विश्वविद्यालय अनुदान आयोग (यू.जी.एसी.) वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद (सी.एस.आय.आर.) भाभा परमाणु अनुसंधान केंद्र (बी.ए.आर.सी) रक्षा अनुसंधान तथा विकास संघटन (डी.आर.डी.ओ) भारतीय अंन्तरिक्ष अनुसंधान संघटन (आय. एस. आर. ओ.) आर्थिक सहाय्य, तसेच वरील संस्थाचे विविध संशोधन प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण. Encyclopedia of Sensors या आंतरराष्ट्रीय विज्ञान नियतकालिकामध्ये विशेष निमंत्रक म्हणून संशोधनपूर्ण एक दीर्घ लेख प्रसिध्द. College of Engineering, Pune (CUEP) या स्वायत्त तंत्रशिक्षण संस्थेचा अभ्यासक्रम निश्चिती समितीवर निवड. अनेक शैक्षणिक व तंत्रशिक्षण संस्थामध्ये विज्ञानविषयक व्याख्यानांसाठी निमंत्रण. शालेय जीवनात शालेय, आंतरशालेय तसेच राष्ट्रीय खो-खो स्पर्धांसाठी प्रतिनिधित्व व त्या स्पर्धामध्ये विशेष नैपुण्याचे दर्शन.गांधर्व महाविद्यालयाचा कथ्थक नृत्याचा शास्त्रीय अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण. गिटार व हार्मोनिअम वादनात विशेष प्रावीण्य. आघारकार रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेचा बागकामविषयक अभ्यासक्रम पूर्ण तसेच वरील विषयात विशेष रुची. मराठी हिंदी व इंग्लिश या भाषांवर प्रभुत्व तसेच फ्रेंच भाषेचा रानडे इन्स्टिट्यूटचा अभ्यासक्रम पूर्ण. माहेरचे नाव : अंजली गंगाधर बेडेकर, पुणे.