गोविंद(अविवाहित)


गोविंद(अविवाहित)
Male View tree
Father: काशिनाथMother: Unspecified
Children: none
Siblings: मीरा(जोशी), कमल(पूरकर), गोपाळ, लीला(केळकर), सुशीला(लिमये), नारायण, हरी(अविवाहित)

गोविंद काशिनाथ – जन्म 09/09/1928. जन्मस्थळ उमरेडे, नागपूर. शिक्षण : बी. ए., बी. टी., एल. एल. बी. जीवनपट : 1954 पासून वकिली व्यवसाय, संत श्री. गुलाबराव महाराज यांच्या संप्रदायाचा सदस्य. कामगार, सहकार, न्याय इत्यांदी विषयावर विपुल लेखन प्रकाशित केले. श्रम-अर्घ्य हा लेख संग्रह प्रसिध्द. 1935 पासून रा. स्व. संघ-स्वयंसेवक, तृतीय वर्ष शिक्षित. 1946 ते 1963 संघ शिक्षा वर्गाचे वेगवेळ्या राज्यांमध्ये प्रमुखशिक्षक, 1964 ते 1991 भारतीय मजदूर संघाचे विदर्भ, गुजराथ, मध्यप्रदेश, ओरिसा येथे कार्य. 1971 ते 1989 या काळात सहमंत्री म्हणून कार्य. न्यूनतम वेतन सल्लागार मंडळाचे 1984 ते 1986 सदस्य म्हणून काम. तसेच केंद्रशासन-बालकामगार सल्लागार मंडळाचे 1978 ते 1981 सदस्य, केंद्रीय श्रमिक शिक्षा मंडळाचे, 1982 ते 1991 सदस्य व 1988-89 मध्ये उपाध्यक्ष. 1972 ते 1978 विदर्भ पदवीधर मतदार क्षेत्रातील महाराष्ट्र विधान परिषदेचा अपक्ष निर्वाचित सदस्य, कार्यानिमित्त भारतभर प्रवास, अधिवक्ता परिषद व कामगार क्षेत्रात सध्या सल्लागार. वास्तव्य : 586 बी, आठवले भवन, गोरे पेठ, नागपूर 440010.