गोत्रे व आडनावे

फार पूर्वीच्या काळात धार्मिक व वेदांचे शिक्षण ऋषीमुनी आपल्या आश्रमात देत असत.  ऋषीमुनीचे आश्रम ही विद्यापीठेच होती. त्यावेळच्या संस्कृतीप्रमाणे शिक्षण हे गुरुकुलात वर्षानुवर्षे राहून घेतले जात होते. आपल्या कुटुंबाप्रमाणेच समजून घेतले जात असे. तसेच त्या गुरुकुलातील व्यक्ती व त्या नंतरच्या पिढ्यांचे सुद्धा शिक्षण तेथेच होत असे. त्यामुळे जे गुरु तेच गोत्र असे झाले असावे.

ऋषिपरंपरेत कोणता वर्ण कोणत्या वंशातील आहे हे समजण्यासाठी गोत्र आणि प्रवर संकल्पनेचा उदय झाला. गोत्र म्हणजे पिढ्यान पिढ्या चालत आलेले ऋषींचे कुलनाम होय. अंगिरस, अगस्त्य, आणि भृगु हे आद्य गोत्रकार समजे जातात. त्याशिवाय वसिष्ठ, विश्वामित्र, भरद्वाज, जमदग्नी, गौतम, कश्यप आणि अत्रि हे सप्तर्षीही गोत्रप्रवर्तक मानले जातात. हे दहा ऋषि आणि त्यांचे पुत्रपौत्रादिक आणि वंशज यांनी स्वतंत्र गोत्रे स्थापन केल्यामुळे वर्णामधील गोत्रसंख्या अगणित झाली आहे.

चित्पावनात चौदा गोत्रे आहेत - अत्रि, कपि, कश्यप, कौंडिण्य, कौशिक, गार्ग्य, जमदग्न्य, नित्युंदन, बाभ्रव्य , भारद्वाज, वत्स, वसिष्ठ, विष्णुवृद्ध, आणि शांडिल्य. गोत्रनामावलीस सुनिश्चित अशा वांशिक चौकटीत बसविण्यासाठी गोत्रनामांना प्रवरांची नावे जोडण्याची पद्धती रूढ झाली आहे. गोत्रकार ऋषींच्या विशेष अशा १ ते ७ मंत्रदृष्ट्या पूर्वज ऋषींचा समावेश या प्रवरांमध्ये करण्यात येतो. बरीच गोत्रनामे हि त्रिप्रवरी अथवा पंचप्रवरी आहेत.       

आपले आठवल्याचं गोत्रप्रवर:- अत्रि - आत्रेयरचनांसश्यावश्चेती असे आहे.