शैला


शैला
Female View tree
Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: केशव
Children: जाई
Siblings: none

शैला केशव – जन्म 10/11/1951. शिक्षण : एम. ए. (फिलॉसॉफी). जीवनपट : मुंबई विद्यापीठातून फिलॉसॉफी विषय घेऊन एम. ए. रंगमंच, आकाशवाणी, दूरदर्शन या तिन्ही माध्यमातून दीर्घकाळ निवेदन, सूत्रसंचालन, मुलाखती पहिल्या जागतिक मराठी परिषदेतील ‘स्मरणयात्रा’ या नावाजलेल्या कार्यक्रमात निवेदन. कै. प्रभाकर पाटणकर यांच्याबरोबर कुसुमाग्रजांच्या कवितांवरचा ‘आरस्पानी-राजवर्खी’ हा गद्य कार्यक्रम सध्या हाच कार्यक्रम विनय आपटे यांच्याबरोबर सादर होत आहे. ‘अष्टपैलू अत्रे’ या अलूरकर म्युझिक हाऊस तर्फे प्रकाशित झालेल्या कॅसेटच्या संकलन-संपादनामध्ये सहभाग. वृत्तपत्र, मासिक यातून लिखाण. ‘स्वरप्रतिभा’- पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या समग्र गायकीचा आढावा घेणारा हक्-श्राव्य कार्यक्रमाची संकल्पना-लेखन-निवेदन. संगीतकार यशवंत देव यांच्यावरील हक्-श्राव्य संकल्पना-लेखन-निवेदन. पुण्यामध्ये झालेल्या गीतरामायणाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात सहभाग. ‘विश्ववामा’ (अर्थात काळोखातले दीपस्तंभ) या हक्-श्राव्य कार्यक्रमाची निर्मिती-संकल्पना व सादरीकरण. (सादरीकरनात सौ. प्रज्ञा ओक यांचाही सहभाग.) काही तेजस्वी स्त्री व्यक्तिरेखांविषयी वाचलं आणि वाटलं की, आपल्यापर्यंत हे पोहचवावं. ज्यांनी वाचलं आणि वाटलं की, आपल्यापर्यंत हे पोहचवावं. ज्यांनी वाचलं नसेल त्यांना तोंडओळख करुन देण्याचा, त्यांच्याही मनात जिज्ञासा निर्माण करण्याचा आणि ज्यांनी वाचलं बाहे, त्यांना वेगळ्या स्वरुपात पुन: प्रत्ययाचा अनुभव देण्याचा प्रयत्न करावा असे त्यांना मनापासून वाटलं. त्याचं फलित म्हणजे ‘विश्ववामा’ हॅरिएट स्टो, एमिलीन पँखर्स्ट, पर्ल बक, जेनी मार्क्स, हेलन केलर, पंडिता रमाबाई, साधनाताई आमटे या स्त्रियांविषयी प्रामुख्यानं कार्यक्रमात बोललं जातं. बाकी आपल्याकडील व पाश्चिमात्य देशांतील अनेक जनींविषयी कार्यक्रमाचा ओघात माहिती दिली. माहेरचे नाव : शैला गंगाधर जोशी, विलेपार्ले